Saturday 9 July 2011

छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ



छावा ठाणे जिल्हा 
छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ-1


छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ 2


छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ-3
छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ 4


छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ -5


छावा राष्ट्रीय अधिवेशन विडीओ -6

Sunday 3 July 2011

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचा लातूर दौरा ०५ जुलै २०११


मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचा लातूर दौरा ०५ जुलै २०११
मराठा आरक्षण या विषयावर महत्व पूर्ण मीटिंग
मा.अण्णासाहेब जावळे पाटील,(संस्थापक अध्यक्ष )यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. भीमराव भाऊ मराठे(केंद्रीय उपाध्यक्ष ),मा.लक्षमण बापू सिरसाट (प्रदेशध्यक्ष ),मा. विजय कुमार घाडगे (प्रदेशाध्यक्ष वि.आ.),मनोज अण्णा मोरे (प्रदेश महासचिव  )व मा.बाळासाहेब भोसले(जिल्हाध्यक्ष)यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे तरी सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी सर्व शाखा अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहवे
ठिकाण;शासकीय विश्रामगृह,लातूर
सकाळी;१० वाजता
सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद ब्रिज होटल लातूर
दुपारी १ वाजता औसा इथे भव्य मेळावा
"भीक नको हक्क हवा मिळवणारच छावा "
for more info contact AAKASH PATIL (DIST PRES STUD ORG)(9545980008)

Thursday 23 June 2011

पंचायत समितीस टाळे ठोकले


Latur News
Thursday, June 23, 2011 AT 05:00 AM (IST)

लातूर (latur) - तांदुळवाडी ग्रामपंचायत सदस्यांकडे सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी व गैरव्यवहार प्रकरणी बोगस ग्रामसभा व भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामसेवक बनसोडे यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा छावा संघटना व तांदुळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा देऊन लातूर पंचायत समितीचा जाहीर निषेध करत पंचायत समितीला टाळे ठोकण्यात आले. यावेळी छावाचे ऍड. गणेश गोमचाळे, आकाश पाटील, तानाजी कोदरे, सिदाजी जगताप, विवेकानंद साळुंके, पद्माकर भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते

छावाच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले बियाणे


Beed News
Wednesday, June 08, 2011 AT 05:00 AM (IST)
व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत
बीड (beed) - जिल्ह्यात खत आणि बियाण्यांची टंचाई जाणवत असतांना व्यापारी मात्र बियाण्यांचा साठा करुन शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. मोंढ्यातील व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा मारुन जप्त केलेले बियाणे आज सकाळी पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. बियाण्याचा साठा केल्या प्रकरणी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी नक्षत्रात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने यावर्षी शेतकरी कापसाची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात कापसाच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असतांना पुरवठा मात्र फारच अल्प प्रमाणात होत आहे. जो पुरवठा होत आहे तोही व्यापारी आपल्याकडेच साठा करुन ठेवत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शहरातील मोंढा भागात असलेल्या व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवले असल्याबाबतची मागणी अखिल भारतीय छावाचे जिल्हाप्रमुख अशोक रोमण यांना मिळाल्यावरुन छावाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छापा टाकुन हे बियाणे ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळी पोलिस बंदोबस्तात या बियाण्याच्या बॅग छापील किंमतीत वाटण्यात आल्या. याबरोबरच कलंत्री यांच्या दुकानात असलेला बियाण्याचा स्टॉकही पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. छावाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळाले आहे. दरम्यान साठेबाजी करुन मल्लीका बीटी कापुस बियाणे विक्री करणारे व्यंकटेश एजन्सीचे मालक केदारनाथ जाजू यांच्या दुकानात कृषी अधिकारी एन.एस. राऊत यांच्या पथकान छापा टाकुन बियाणे जप्त केले. याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत केला आहे. दरम्यान, छावा व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे

तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा

Tuesday, April 26, 2011
पारोळा -  तालुक्‍यात खुलेआम विविध अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक शरद घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा : पारोळा तालुक्‍यात सद्यःस्थितीत सर्रास अवैध धंद्ये सुरू आहेत. विशेषतः सट्टा (मटका), जुगार, गावठी दारू अड्डे, पैसे लावून खेळविण्यात येणारा कॉइन गेम असे अनेक अवैधधंदे शहरासह तालुक्‍यात बोकाळले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तरुणी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी शहरासह तालुक्‍यातील सर्व अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास एक मेस (महाराष्ट्र दिनी) अखिल भारतीय छावा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते स्वतः हातात दंडुके घेऊन सुरू असलेले हे अवैधधंद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करतील. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाल्यास, तसेच होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील, अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नेरकर, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष दिनेश पाटील, तालुका संपर्कप्रमुख विजय भिला पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फॅक्‍सद्वारे पाठविण्यात आल्या आहे